सामाजिक

कोठी येथे विकासाचा उत्सव ग्रामपंचायत भवनासह विविध कामांचे लोकार्पण

महंत ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री,खा. बजरंग बप्पा सोनवणे, माजी आमदार संगीता ठोंबरे यांची उपस्थिती

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे कोठी येथे ग्रामपंचायत भवनासह रस्ते,पाणी पुरवठा,प्रकाश व्यवस्था आणि इतर सार्वजनिक सोयीसुविधांच्या विविध कामांचा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा रविवार दि.10 आॕगष्ट रोजी जल्लोषात पार पडला.ग्रामस्थांचा उत्साह आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा भरली होती.

ठळक मुद्दे

ग्रामपंचायत भवनासह अनेक विकासकामांचे लोकार्पण,गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा टप्पा

उपसरपंच बप्पा डोंगरे यांच्या कार्याचे कौतुक.

सोहळ्याची वैशिष्ट्ये 

नव्याने बांधलेले ग्राम पंचायत भवन हे केवळ एक कार्यालय नसून गावाच्या प्रगतीचे केंद्रस्थान ठरणार आहे. सोबतच रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, वीजप्रकाश व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले.

महंत ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थान रामराजे डोंगरे यांनी भूषविले, उद्घाटक म्हणून बीड जिल्ह्याचे खासदार मा.बजरंग बप्पा सोनवणे आणि प्रमुख पाहुणे माजी आमदार संगीताताई ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी कोठी गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.तसेच कोठीचे उपसरपंच बप्पा डोंगरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे,बंडू चौधरी,शेकाप नेते भाई मोहन गुंड,माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चौरे, केजचे नगरसेवक भाऊसाहेब गुंड,विलास जोगदंड,ग्रामसेवक गोरे मॅडम व पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!