सामाजिक

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त केज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौटुंबिक एकत्रीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला,सचिन दादा नेहरकर यांचा वाढदिवस औक्षण करून साजरा ; ३० कुटुंबांचा सहभाग

केज/प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुटुंब प्रबोधन विभागातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त केज येथे दिनांक ६ ऑक्टोबर रोजी एक भव्य कौटुंबिक एकत्रीकरण कार्यक्रम संपन्न झाला.रात्री ८ ते १२ यावेळेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास परिसरातील तब्बल ३० कुटुंबांसह स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकने झाली. त्यानंतर कुटुंब प्रबोधन विभागाचे प्रांत सहप्रमुख श्री.  महेश माणिकराव आनंदगावकर यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एकत्र कुटुंब पद्धतीचेमहत्व अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी विविध सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले. लहानग्यां पासून वृद्धांपर्यंत सर्वांनी मैदानावर खेळ खेळून एक वेगळाच आनंद लुटला. यानंतर कोजागिरी पौर्णिमा साजरी करत दूध प्राशन व अल्पोपहार घेऊन उपस्थितांनी रात्रीचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमात आणखी एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सचिन दादा नेहरकर यांचा वाढदिवस. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सौ.अनुराधा नेहरकर यांच्या हस्ते औक्षण करून सचिन दादांचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे स्थानिक कार्यकर्ते, कुटुंब प्रबोधन विभागाचे स्वयंसेवक आणि सहभागी कुटुंबांचे विशेष योगदान लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!