उद्दिष्टपुर्ती पेक्षा जास्त वसुली करीत केज शहर पथकाचे यशस्वी नेतृत्व करत अभियंता सय्यद सह महा वितरण च्या केज उपविभागाची उज्वल कामगिरी

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) केज उप विभागांतर्गत केज शहर पथक कार्यालय एक ने जुलै 2025 मध्ये थकबाकी वसुलीत 104 टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल कार्यकारी अभियंता सय्यद मिनाजोहीन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पथक व इतर कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
केज उपविभाग अंतर्गत एकूण 6 पथक कार्यरत असून,त्यामधून केज शहर पथक-एक ची सर्वाधिक वसुली झाली आहे.या पथकाचे जुलै महिन्याचे वसुलीचे उद्दिष्ट 1कोटी 28 लाख रुपये होते.मात्र,कनिष्ठ अभियंता शितल सय्यद मॅडम यांच्या नियोजन बद्ध आणि जोमदार कामकाजामुळे थकबाकी व चालू बिले मिळून एकूण 1 कोटी 34 लाख थकीत विज बिल व माहे जुलै 2025 चे डिमांड वसूली करण्यात आले.त्याच प्रमाणे अन्य पथकांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे.
केज ग्रामीण पथक–एक ने 1 कोटी 28 लाख च्या उद्दिष्टापैकी 1 कोटी 34 लाख रुपये वसूली केली आहे.
युसुफवडगाव पथक उद्दिष्ट 32 लाख होते त्यांनी वसुली 22 लाख वसुली केली आहे.
बनसारोळा पथक यांना वसुलीचे उद्दिष्ट 17 लाख होते त्यांनी 15 लाख वसुली केली आहे
मस्साजोग पथक उद्दिष्ट 22 लाख रुपये होते. त्यांनी वसुली 13 लाख रुपये केली आहे.
नांदुरघाट पथकाला वसुलीचे उद्दिष्ट 18 लाख रुपये होते त्यांनी 11 लाख रुपये वसुली केली आहे.या संपूर्ण वसुली मोहीमेमुळे केज उपविभागाची एकूण वसुली 90 टक्के झाली आहे.या कामगिरीसाठी उप कार्यकारीअभियंता सय्यद मिनाजोद्दीन, कनिष्ठ अभियंता शितल सय्यद,सहाय्यक अभियंता हलगुडे, सहाय्यक अभियंता वैरागे, सहाय्यक अभियंता बोराटे मॕडम, कनिष्ठअभियंता अंडील साहेब यांच्यासह मुख्य तंत्रज्ञ विष्णु तेलंग, गायकवाड,बनसोडे, डिकले,शिंदे,बडे,आजम,चौधरी,लामतुरे,केंद्रे मॕडम,सय्यद आक्रम, गालफाडे,रोहनसिरसट, बीलिंग सहाय्यक लेखा अधिकारी जोशी साहेब मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
या यशस्वी वसुलीबद्दल कार्यकारी अभियंता *सय्यद मिनाजोहीन* यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत पुढील काळातही अशीच प्रेरणादायी कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे.



