सामाजिक

शिक्षक कॉलनी मित्र परिवारातर्फे हारुणभाई इनामदार यांचा जंगी सत्कार,केजमध्ये मान्यवरांच्या मांदियाळीत सोहळा संपन्न ;विविध क्षेत्रांतील व्यक्तींचाही गौरव

केज/प्रतिनिधी

बीड रोडवरील शिक्षक कॉलनी मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गटा) चे नेते हारुणभाई इनामदार यांचा दि.१ जानेवारी २०२६ गुरुवारी हृदय सत्कार करण्यात आला.ह.भ.प.राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरा समोर आयोजितकरण्यात आलेल्या या सोहळ्यात सामाजिक सलोखा आणि स्नेहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

मान्यवरांचा गौरव आणि उपस्थिती या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हारुणभाई इनामदार यांच्या सोबतच रमाकांत ढाकणे सर,योगेश हांगे आणि अनिल चौरे यांचाही त्यांच्या विशेष कार्याबद्दल व प्रगटदिना निमित्त गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड,नगर सेवक पद्मिनी अक्का शिंदे,आमेर इनामदार सरकार,सागर बनसोड, सोहेब इनामदार आणि मुजाहिद इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.या सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींना सन्मानित करण्यात आले.युवकांचा उत्साह आणि सहभाग या स्नेह सोहळ्याला पत्रकार प्रकाश मुंडे आणि खय्युम शेख यांनी विशेष उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शिक्षक कॉलनीतील युवकांनी मोठी मेहनत घेतली.

यावेळी प्रामुख्याने बाबासाहेब केदार सर,रवि घुले,चंदू चौरे, गोटू भैय्या पाळवदे,वैभव सोनू धस, अमोल धस,अमोल मुंडे, बबलू साखरे,मनोज शिंदे,nअमोल ठोंबरे,अतुल ठोंबरे,आशिष केदार,विकास मुळे,केशव बच्छाव,सोहम अंधारे, शशिकांत ढाकणे सर आणि नवनाथ घुले यांच्यासह मोठ्या संख्येने युवक आणि नागरिक उपस्थित होते.सामाजिक बांधिलकीचा वारसा शिक्षक कॉलनी मित्र परिवार व हा परिसर केवळ रहिवासी वस्ती नसून,विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतो.या भव्य सत्कार सोहळ्यामुळे कॉलनीच्या एकोप्याची चर्चा संपूर्ण परिसरात होत असून,सर्व स्तरांतून सत्कार मूर्तींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!