कृषी

केज खरेदी -विक्री संघात सोयाबीन,उडीद व मुगाची ऑनलाईन नोंदणी करावी – बालासाहेब बोराडे 

केज/प्रतिनिधी

केज तालुका खरेदी-विक्री संघ नाफेड अंतर्गत आधारभूत किमतीने सोयाबीन,उडीद व मूग खरेदी योजना 2025 – 2026 सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.या खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची शासकीय हमीभावाने खरेदी होणार आहे. याची ऑनलाईन नोंदणीप्रक्रिया खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सुरु करण्यात आल्याची माहिती चेअरमन बालासाहेब बोराडे यांनी दिली आहे.

खरेदी-विक्री संघ शेतकऱ्याला त्यांच्या शेत मालाची वेळेवर खरेदी व्हावी व योग्य भाव मिळावा म्हणून खा. बजरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत क्रियाशील व प्रयत्नशील राहिलेला आहे.

प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी शासनाने हमीभावाप्रमाणे खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी दिली आहे.या शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनला 5328 रुपये मूग 7800 रुपये तर उडीद 8768 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.ऑनलाईन नोंदणीसाठी 7/12, 8 अ उतारा(ई पीकपाहणीसह), आधारकार्ड, बँक पासबुक घेऊन संबंधित शेतकरी बांधवाने नोंदणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक व अनिवार्य आहे.नोंदणीची अंतिम तारीख 31 डिसेंबर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली .

तसेच प्रत्यक्ष खरेदी 15 नोव्हेंबर पासून सुरुहोणार असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन चेअरमन बालासाहेब बोराडे,व्हाईस चेअरमन दत्तात्रय (पिंटु) ठोंबरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!