सामाजिक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा-केज यांच्या वतीने नव निर्वाचित पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

केज / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा-केज यांच्या वतीने नव निर्वाचित पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ शासकीय विश्रामगृह,केज येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रकाशपर्व न्यूज पोर्टल बीड जिल्हा संपादक पदी लिंबराज शंकरराव गायकवाड,दैनिक वादळ वार्ता बीड जिल्हा संपादक पदी कपिल अंबादास मस्के आणि पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हाध्यक्ष पदी रणजित तात्याराम घाडगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमास केज तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे होते.त्यांच्या सोबत तालुका उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,पांडुरंग कसबे, नंदूलाल मिसाळ,पुरोगामी पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष दिनकर जाधव,सक्रिय पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष संतोष गालफाडे, सह्याद्री पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष अनिल ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पत्रकार धनंजय कुलकर्णी, मुब्बशीर खतीब,सचिन भालेराव,महादेव काळे, दीपक नाईकवाडे, दत्तात्रय मुजमुले, बाळासाहेब जाधव, सुहास चिद्रवार,अनिल वैरागे,संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे,पत्रकार मनोराम पवार,दिलीप खाडे,सचिन लांडगे, मुनीर कुरेशी,कल्याण मस्के,बलभीम मस्के, लक्ष्मण ओव्हाळ, भगवंत वायबसे,दत्ता गायकवाड सर,सरपंच शशिकांत इंगळे,लक्ष्मण ओव्हाळ,भगवंत वायबसे,आश्रुबा खरात यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन दैनिक वादळ वार्ता चे संपादक अजय भांगे यांनी केले.तसेच प्रास्ताविक पांडुरंग कसबे यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पाटील यांनी केले.सत्कारमूर्ती कपिल मस्के,रणजित घाडगे आणि लिंबराज गायकवाड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कार प्रसंगी शाल,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व पेन देऊन नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे योगदान व उपस्थितीमुळे समारंभ यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!