लाडेवडगाव येथे खांबावर काम करताना शाॅक लागून कामगाराचा दुर्देवी मृत्यू ;अंबाजोगाई महावितरण मुख्य कार्यालयास निवेदन -डाॕ.वासुदेव नेहरकर


केज/प्रतिनिधी
विद्युत लाईन ओढताना अचानकपणे तारेमध्ये विद्युत प्रवाह सूरू होवून झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना केज येथून जवळच असलेल्या लाडेवडगाव येथे घडली असून,या प्रकरणी मंगळवार दि.२६ मे रोजी अंबाजोगाई येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खाजगी कंञाटदाराच्या हस्ते लाडेवडगाव ता. केज येथे विद्युत खांबावर लाईन ओढण्याचे काम सूरू होते,दरम्यान अचानकपणे तारेमध्ये विद्युत प्रवाह सूरू होवून झालेल्या दुर्घटनेत संतोष सोनेराव निकम रा. पोखरी ता.अंबाजोगाई जिल्हा बीड नामक कामगाराचा शाॅक लागून मृत्यू झाला.या घटनेचा निषेध करीत केज कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती डाॅ.वासुदेव नेहरकर,पोखरी गावचे सरपंच,मयताचे नातेवाईक यांनी अंबाजोगाई येथील महावितरण मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयास निवेदन देऊन सदरील प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



