सामाजिक

आनेगाव येथे मराठी भाषा गौरव दिनी रंगला सांस्कृतिक सोहळा ; विद्यार्थ्यांच्या कला अविष्कारांनी आनेगाव शाळेत दणाणला मराठी गौरव दिन

केज/प्रतिनिधी

मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनेगाव येथे दि.२७ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शनाचा अर्थात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बालगीत, लोकगीत, भारुड, लावणी, नाटिका तसेच देशभक्ती पर गीत अशा विविध कलाविष्कारांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली तब्बल २५ हून अधिक कलाप्रकार सादर करण्यात आले.

कार्यक्रमासाठी श्री. चोपणे सर केंद्रीय मुख्याध्यापक,युसुफ वडगाव,दत्तात्रय मुजमुले जिजाऊ इंग्लिश स्कूल, धनेगाव तसेच अशोक चौधरी वसुंधरा विद्यालय, पैठण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात “तुला मास्तर बोलवाले ले” या गीताने करण्यात आली,तर समारोप “शाळा मराठी माझी शाळा मराठी गं” या गीताने झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक गुजर डी. व्ही,सौ.बावचकर एल. एस.सहशिक्षिका व हंडीबाग कोमल अमोल ट्रेनी शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी गवळी व कु. श्रेयसी काळे यांनी उत्कृष्टरीत्या केले.या सांस्कृतिक सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव मिळाला असून,मराठी भाषेबद्दल चा अभिमान अधिक दृढ झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!