तांबवा येथे भिमरत्न युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
समाजात धम्म,समता आणि बंधुभावाचा संदेश प्रसारित करण्याच्या उद्देशाने,भिमरत्न युवा प्रतिष्ठान तांबवा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.या मंगल प्रसंगी आयोजित विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गावातून भव्य मिरवणूक आणि मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाची सुरुवात सकाळी तांबवा बस स्टँड ते बुद्ध विहार या मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली. ढोल-ताशांचा गजर, निळ्या ध्वजांची पंढरी आणि “जय भीम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. यानंतर बुद्ध विहार येथे मंगलमय वातावरणात, विधीपूर्वक बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.दुपारी सर्व उपस्थितांसाठी धम्मप्रसाद (अन्नदान) आयोजित करण्यात आला होता.तर सायंकाळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली,यामुळे गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून तांबवा येथील सरपंच दिपालीताई अरुण चाटे तर प्रमुख पाहुणे माजी आ. पृथ्वीराज साठे,माजी केज प.स.सभापती ऋषिकेश आडसकर, बालासाहेब जोगदंड तालुका अध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा,केज, रामधन चाटे उप सरपंच,तांबवा भिवाजी कांबळे,विष्णू कांबळे, अशोक खाडे कचरू खाडे माजी सैनिक, कचरू ओव्हाळ समाजसेवक,सदाशिव ओव्हळ, दिलीप ओव्हाळ, अभिमान शिंदे,संजीवन ओव्हाळ,संदिपान ओव्हाळ यशस्वी नियोजनात समिती व प्रतिष्ठानचे योगदान हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जयंती समिती आणि भिमरत्न युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भिमरत्न युवा प्रतिष्ठानने दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकी बद्दल गावकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच या प्रतिष्ठानकडून येणाऱ्या काळातही अशाच प्रकारचे लोकोपयोगी,सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवावेत असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
जयंती समितीचे सदस्य शाहू कांबळे,अशोक ओव्हाळ, नवनाथ ओव्हाळ,नवा ओव्हाळ, भिमरत्न युवा प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य संभाजी कांबळे,गोरख ओव्हाळ, सिद्धार्थ ओव्हाळ, सिद्धार्थ ओव्हाळ,सचिन ओव्हाळ,अंबादास ओव्हाळ,राहुल ओव्हाळ, आकाश कांबळे,महादेव लांडगे, समाधानओव्हाळ, महेश ओव्हाळ.यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.



