साबला येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी, मान्यवरांचा केला विशेष गौरव

केज/प्रतिनिधी
साबला येथील ग्राम पंचायत कार्यालय आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला.
हा सोहळा शनिवार,दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९-०० वाजता साबला येथील श्रीराम भक्त हनुमान मंदिर परिसरात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवाती ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा जागर केला.
या विशेष गौरव सोहळ्यात समाजातील विविध स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
डॉ.दिनकर रावसाहेब राऊत,प्रा.विष्णू रानबा सरवदे, कु.ऋतुजा अशोक नाईकनवरे,चि. अविनाश गुलाब काकडे, श्रीमती वैशाली विजय सरवदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शांतिनाथ बनसोडे सर परीक्षा नियंत्रक नांदेड विद्यापीठ व माजी सभापती श्री. विष्णुभाऊ घुले उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक श्री.सुधीर नाईकनवरे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामायणाचार्य लक्ष्मण काकडे यांनी आपल्या मधुर वाणीतून केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक श्री.नरहरी काकडे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय, साबला यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला साबला नगरीतील नागरिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.महात्मा फुलेंचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोंचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी उपस्थित उपसरपंच कचराबाई सरवदे,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, पोपट काकडे,अशोक काकडे,तसेच काशिनाथ नाईकनवरे,अभिमान नाईकनवरे,श्रीमंत नाईकनवरे,हनुमंत नाईकनवरे,गणेश कटारे, गुलाब मुळे,विश्वनाथ नाईकनवरे,महादेव कटारे,अशोक नाईकनवरे व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि उत्साहाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.



