माजी सरपंच पुत्राच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील मगर वस्तीवर राहणाऱ्या व नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या अनुजा सूर्यकांत मावकर वय १५ वर्षे या विद्यार्थिनीने मंगळवारी दि.७ एप्रिल रोजी रात्री राहत्या घरी दार बंद करून घराच्या छताच्या लोखंडी हुकला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील मगर वस्तीवर राहणारी विद्यार्थिनी अनुजा सूर्यकांत मगर ही गावातील संस्थेच्या शाळेत गेल्या वर्षी नववी च्या वर्गात शिक्षण घेत असतानाही गावातीलच अक्षय भगवान काळे वय २७ वर्षे हा तीचा सतत पाठलाग करून,तीला बोलण्याचा प्रयत्न करून तीला त्रास देत होता. त्यामूळे तिच्या नातेवाईकाने तीला दहावीच्या वर्षी केज येथील सरस्वती कन्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले होते.
व राहण्याची व्यवस्था वारकरी शिक्षण संस्थेमध्ये केली होती. परंतु तेथेही अक्षय या मुलीचा पाठलाग करून तीला बोलण्याचा प्रयत्न करीत होता.मंगळवारी दि.७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान अनुजा मावकरचे आई, वडील हे घराशेजारीच असलेल्या शेतात गेले असताना त्याने मगर वस्तीवर येऊन अनुजाला बोलण्याचा प्रयत्न केला असता अनुजा घरात पळून गेली.परंतु त्यानंतर ती तणावाखालीच होती. रात्री १० वाजता सर्वांचे जेवण झाल्यानंतर अनुजा मावकर हीने राहत्या घरात जाऊन आतून कडी लावून घेतली व छताच्या लोखंडी हुकला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.
रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पार्थिव केज उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी अनुजाचे वडील सूर्यकांत तुकाराम मावकर यांच्या फिर्यादी वरून अक्षय भगवान काळे या ट्रॅक्टर चालकाच्या त्रासाला कंटाळानच अनुजा हिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसात अक्षय काळे विरुद्ध गून्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक सुकुमार बनसोडे हे करीत आहेत.


