जात पंचायती साठी बोलवून महिलेस मारहाण,चौघांविरुद्ध गून्हा नोंद

केज/प्रतिनिधी
शनिवार दिनांक २ मे रोजी केजला जात पंचायत आहे म्हणुन बोलावून घेवून विनाकारण शिवीगाळ करून,लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौघाविरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.पारा येथील ललिता भागवत शिंदे या महिलेचे तीचा पती भागवत शिंदे सोबत पटत नाही.म्हणुन ही महिला सद्या बोबडेवाडी येथेच माहेरी राहते.
दोघांच्या मधील मतभेद कमी करण्यासाठी जात पंचायतीचे आयोजन केले असल्याचा निरोप देऊन ललिता शिंदेला केजला बोलावून घेतल्या वरून ही महिला केजला आली असता शनिवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या दरम्यान केज येथील बसस्थानक परिसरात आरोपीतानी संगनमत करून विनाकारण शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले.व साक्षीदार भांडण सोडविण्यासाठी आले आसता त्यांना ही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ललिता भागवत शिंदे रा.पारा ह. मु.बोबडेवाडी या महिलेच्या फिर्यादीवरून पती,भागवत शामा शिंदे, नवनाथ बाबू शिंदे,राजेंद्र सुबराव शिंदे,व कृष्णा नवनाथ शिंदे या चौघां विरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद झाला आसून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक बालासाहेब रोडे हे पुढील तपास करीत आहेत.



