सामाजिक

काशीदवाडी,नागझरी येथे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

केज / प्रतिनिधी

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त येवता जिल्हा परिषद सर्कल मधील मौजे काशीदवाडी व नागझरी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली.या निमित्ताने काशीदवाडी व नागझरी येथील जिल्हा परिषद शाळा तसेच वस्ती शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

भाजपाचे नेते विष्णू भाऊ घुले यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी व लोकनेत्यांच्या सामाजिक विचारांची जपणूक व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला.

यावेळी काशीदवाडी व नागझरी येथील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,चेअरमन,व्हाईस चेअरमन,प्रमुख कार्यकर्ते तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदुलाल मिसाळ यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!