सामाजिक

केज नगरपंचायतीत घरकुल घोटाळ्यासह इतर ही कोट्यवधींचा भ्रष्टाचार ; चौकशीसाठी भाई मोहन गुंड यांचं २७ मार्चपासून अन्नत्याग आंदोलन

केज/प्रतिनिधी

केज नगरपंचायतीच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत, विविध विकासकामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी शेकापचे नेते भाई मोहन गुंड येत्या २७मार्च पासून नगरपंचायती समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. घरकुल घोटाळा,रस्त्यांची बोगस कामे आणि निधी चा अपहार अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

नेमका प्रकार काय?

सन २०१५ ते मार्च २०२६ या कालावधीत केज नगरपंचायतीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेषतः पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे इतर खात्यांवर वर्ग करणे, रस्ते न बनवता बिले उचलणे आणि कामांची गुणवत्ता निकृष्ट असणे अशा तक्रारींनी केज शहर चर्चेत आले आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या:

घरकुल घोटाळा (३.६२ कोटी)पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या हक्काचे ३ कोटी ६२ लाख रुपये हडप करण्यात आले आहेत.ही रक्कम मूळ लाभार्थ्यांना त्वरित मिळावी किंवा त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत.

रस्ते कामांचा बोगस कारभार 

मंगळवार पेठ कॉर्नर ते आंबेडकर चौक या कामासाठी मंजूर ८० लाख ६० हजार रुपयांचा निधी काम न करताच उचलला गेल्याचा आरोप आहे,त्याची सखोल चौकशी व्हावी.

दलित वस्ती सुधार योजना: 

फुलेनगर रस्त्यासाठी मंजूर १ कोटी ६३ लाख ६३ हजार रुपयांच्या कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी,तसेच सभागृहासाठीच्या निधीचा विनियोग तपासला जावा.

जनरल खाते तपासणी- 

२०१९ ते २०२६ या काळात नगरपंचायतीच्या जनरल खात्यातून झालेला सर्व खर्च सार्वजनिक करावा.

शाळेची जागा व नाहरकत प्रमाणपत्र: जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जागा हस्तांतराचा ठराव रद्द करावा आणि वाईन शॉपसाठी नियमबाह्य ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

उच्चस्तरीय चौकशी समिती- २०१५ ते २०२६ या कालावधीतील सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी.

प्रशासकीय यंत्रणा सतर्क

भाई मोहन गुंड यांनी २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरूहोणाऱ्या या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.जोपर्यंत ठोस चौकशीचे आदेश मिळत नाहीत आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.या आंदोलनामुळे नगरपंचायतीच्या गोटात मोठी खळबळ माजली असून,केज शहरातील नागरिक याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.

पात्र लाभार्थ्यांचे पैसे हडप करणे आणि कागदावर रस्ते दाखवून निधी लाटणे हा जनतेच्या पैशांचा द्रोह आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील.”

— भाई मोहन गुंड (नेते, शेकाप)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!