दुकानासमोर मुलाने दुचाकीचा हॉर्न का वाजवीला?म्हणुन बाप, लेकाला लोखंडी रॉडने मारहाण

केज/प्रतिनिधी
तुझ्या मुलाने माझ्या दुकानासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवीला ?अशी कुरापत काढून काशीदवाडी येथील पिता, पुत्रांना लाथा, बुक्क्याने मुक्का मार देऊन,व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी महादेव जाधवर यांच्या फिर्यादी वरून बाप,लेकासह तिघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुरूवार दि.१९ मार्च रोजी सायंकाळी गून्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील काशीदवाडी येथील एका किराणा दुकाना समोर तुझ्या मुलाने दुचाकीचा हॉर्न का वाजवीला?अशी कुरापत काढून बाप, लेकाला लाथा,बुक्क्याने मुक्का मार देऊन व लोखंडी रॉडने मारहाण करून,आमच्या नादाला लागलास तर तुला जीवे मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी महादेव जयद्रथ जाधवर यांच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात अशोक भगवान जाधवर,सुमित अशोक जाधवर या बाप लेकासह दादा वशिष्ठ जाधवर तिघेही रा.काशीदवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार हनुमान मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.



