रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांचे रमाकांत (बापू) मुंडे परिवाराने घेतले आशिर्वाद


केज/प्रतिनिधी
केज शहरापासुन जवळच असलेल्या बीड रोड वरील ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांनी आयोजित केलेल्या भगवान श्रीकृष्ण मंदिरा-च्या भव्य भूमिपूजन सोहळ्या निमित्त १०८ कुंडी भव्य महाविष्णु याग,यज्ञ कार्यक्रम दि.११ मार्च बुधवार पासुन सुरु झाला असन गुरुवार दि.१२ मार्च पासुन ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून संगीत रामकथा सुरु झाली असुन यावेळी उपस्थित झालेले ह.भ.प.
रामराव ढोक महाराज यांचे स्वागत भाजपाच्या महीला अध्यक्षा तथा माजी जि.प.सदस्या सौ. उषाताई मुंडे व भाजपाचे जेष्ठ नेते रमाकांत बापू व मुंडे परिवाराने पुष्पहार घालून ढोक महाराज यांचे आशिर्वाद घेतले.
केज शहरा पासुन जवळच असलेल्या भगवान श्रीकृष्ण आश्रम बीड रोड येथे श्रीकृष्ण मंदिराच्या भव्य भूमिपूजन सोहळ्या निमित्त १०८ कुंडी भव्य महाविष्णु याग,यज्ञ कार्यक्रम दि.११ मार्च बुधवार पासुन सुरु झाला असून गुरुवार दि.१२ मार्च पासुन ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून संगीत रामकथा दररोज दुपारी २ते ५ यावेळेत ही कथा सुरु आहे.
या कथेला नागरीक व महिलांची मोठी गर्दी होत आहे.अनादि कालापासून ऋषि-मुनि जगत्कल्याणा साठी त्यांचे यज्ञाद्वारे पूजन करत आले आहेत “विष्णु यज्ञेन सर्वत्र सिध्दिर्भवति” आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितल्या प्रमाणे श्री विष्णु यज्ञाने सर्व सिद्धी अर्थात इच्छापूर्ती विवाह-शुभ फल प्राप्ती, वंशवृद्धी, पितृदोष निवृत्ती तथा दारिद्र्यनाश होऊन महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
तसेच तन,मन शुद्धी, संकल्पसिद्धी, अध्यात्मीक उन्नती होते. सकल मनोकामना पूर्ण करणारा ‘महाविष्णु याग’ भगवान श्रीकृष्ण आश्रम या ठीकाणच्या या महा यज्ञामधे अनेक परिवार सहभागी होऊन जीवनातील काम,क्रोध, लोभ, मोह, मत्सर इत्यादी दुर्गुणांची व व्यसनांची आहुती या यज्ञामध्ये देऊन सुख,शांती व समाधान प्राप्त व्हावे यासाठी या यज्ञ सोहळ्यात दि.१२ मार्च रोजी सौ.उषाताई रमाकांत मुंडे,सौ. पुनमताई मधुर मुंडे, मुलगी ईरा दिदी यांनी सहभागी होऊन ही पुजा करुन सदैव सुखी व आनंदी राहण्याची इच्छा व्यक्त करुन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य, श्री.ह.भ. परमपूज्य रामराव महाराज ढोक यांचे स्वागत रमाकांत बापू, उषाताई ,ईरा दिदी, पुनमताई, मधुर भैय्या मुंडे यांनी पुष्पहार घालून स्वागत करुन ढोक महाराज यांचा आशिर्वाद घेतला. तसेच दररोज रामकथा व किर्तनाचे नियमितपणे श्रवण करण्याचा निर्णय घेतला आहे.



