सामाजिक

युसुफ वडगाव मंडळा तील मौजे सुकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१ संपन्न

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील युसुफ वडगाव मंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा-१ कळंब – अंबाजोगाई रोड वरील सुकळी (गोटेगाव) येथील निसर्गराजा मंगल कार्यालय येथे दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले.सदरील शिबीरास युसुफ वडगाव मंडळा तील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबीरास श्री.दीपक वजाळे उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई, श्री.अशोक भंडारे नायब तहसीलदार केज यांचे मार्गदर्शन लाभले. नागरिकांना एकाच दिवसात सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.श्री.विकास हजारे मंडळ अधिकारी युसुफवडगाव व युसुफ वडगाव मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले या विशेष शिबिरात शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध दाखले व शासकीय सेवांचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!