संत तुकाराम महाराजांनी गाथेतून ज्ञान,विज्ञान, तत्वज्ञान सांगितले व लोकांना आत्मभान दिले. – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड

केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक ५ मार्च २०२६ रोजी संत तुकाराम बीज गाथा प्रवचन,गाथावाचन करून साजरी करण्यात आली.सर्वप्रथम संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.त्यानंतर ह.भ.प.नारायण भाऊ गायकवाड यांनी संत तुकाराम गाथेतील अभंगावर प्रवचन दिले. त्यानंतर गाथा वाचन माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव,एस.के.वैरागे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून बन्सीनाना गायकवाड,रामदास राऊत,अरुण गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते,प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.अध्यक्षीय समारोपात संत तुकाराम महाराजांनी गाथेतुन ज्ञान,विज्ञान,तत्वज्ञान सांगीतले व सर्वसामान्य लोकांना आत्मभानाची अनुभुती गाथेतून दिली असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.विज्ञान कथा सादरीकरण सार्थक गायकवाड, आनंद गायकवाड,श्रुती पुंड, श्रुती गायकवाड, एस.के. वैरागे, संध्या तट यांनी केले.अध्यक्षीय समारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. दोन्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विधार्थी,वाचक, जेष्ठ नागरीक उपस्थित होते.



