

केज/प्रतिनिधी
शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या महाराज प्रतिष्ठान केज आयोजित शिव जन्मोत्सव २०२६ निमित्त तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा.वि.केज शाळेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले बक्षीसाचे स्वरूप सन्मानचिन्ह व रोख रक्कम ११००० रुपये तसेच पत्रकार संघा मार्फत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, राष्ट्रीय पत्रकार संघ केज, पुरोगामी पत्रकार संघ व सह्याद्री पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय नृत्यस्पर्धा – २०२६ मध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा.वि.केज शाळेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले बक्षिसाचे स्वरूप सन्मानचिन्ह व रोख रक्कम ३८०० रुपये या दोन्ही स्पर्धेत अनुक्रमे ४० व ३० शाळांनी सहभाग नोंदवला होता या दोन्ही स्पर्धेत शाळेतील सातवी अ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकपरंपरा शेतकरी लोकगीत सादर केले .
या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी अपूर्वा सोनवणे, संस्कृती गायकवाड, किशोरी मुळे,तेजस्विनी कापरे,सृष्टी अडसूळ, समृद्धी नेहरकर,स्नेहा सोनवणे,नंदिनी सपाटे, श्रेया धपाटे,क्रांती धपाटे, आरती तपसे,प्रांजली घोळवे,श्रुती सावंत,प्राची ढोबळे,आरती फरके, हिंदवी खराडे,श्रावणी लोंढे,समर्थ येळवे,महेश चवरे,प्रसाद ढोबळे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे सर यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग सहाय्यक कल्याण आदमाने,दादासाहेब गायकवाड,शिवाजी समुद्रे यांचे सहकार्य लाभले.वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी.बी. गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, कोषाध्यक्ष फजीलोद्दीन काजी,संचालक नारायण अण्णा अंधारे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.



