
केज /प्रतिनिधी
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे जागातिक एड्सदिन व जागतिक दिव्यांगदिन कार्यशाळा घेवून संपन्न झाला.दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिन कार्यशाळा घेवून साजरा करण्यात आला.सदरील कार्यशाळा स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव च्या वाचन कक्षात सकाळी ११ ते दुपारी ०४ या वेळेत कार्यशाळा घेण्यात आली.
सदरील कार्यशाळेत आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाणचे संस्थापक कार्यवाह,जेष्ठ विचारवंत व जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड, माजी सरपंच रामराजे गायकवाड, सेवानिवृत्त ग्रामसेवक एस.पी. गायकवाड,वामन गायकवाड, रमेशराव गायकवाड,एस.के.वैरागे, पांडुरंग गायकवाड,आनंद भैय्या गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.मानवी सद्विचार व मानवी सद्वर्तन देच खरे-खुरे औषध असल्याचे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.इतर मान्यवरांनीही एड्स निर्मूलनासाठी तरुण वयात स्वतःवर बंधने घालण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला रावसाहेब जाधव,अरुण गायकवाड, प्रकाश गायकवाड यांच्या सह युवकांची उपस्थिती होती.दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिन कार्यशाळा घेवून साजरा करण्यात आला.या कार्यशाळेत संस्थेचे संस्थापक कार्यवाह,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, प्राचार्य, डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड,दिव्यांगाचे प्रतिनिधी माजी सरपंच रामराजे गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, रमेशराव गायकवाड, आनंद भैय्या गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
दिव्यांग धोरण शासनाचे चांगले आहे पण प्रत्यक्ष अंमल बजावणी धिम्या गतीने व त्रयस्थपणे होताना दिसत आहे. दिव्यांगाना सहानुभुतीची नव्हे तर सन्मानाची गरज आहे. त्यांच्यासाठी,बस, रेल्वे,विमान येथे सुविधा हव्यात याची अंमल बजावणी हवी आहे,मात्र प्रत्यक्षात दिव्यांगांना मानहानी व अपमान आणि अवमान सहन करावा लागतोय, शिक्षणात ही दुर्लक्ष व हेळसांड होतेय.
रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात दिव्यांगांना उपलब्ध करून शासनाने द्या याला हव्यात मात्र संधी हव्या त्या प्रमाणात दिली जात नाही.
दिव्यांगांच्या आरोग्याच्या समस्याच समस्या असताना त्यांना आरोग्य विषयक सेवा सुविधा मिळत नाहीत,ग्रामीण भागात तर दिव्यांगांच्या आरोग्याची खुपच जास्त हेळसांड होताना दिसतेय हे वास्तव नाकारून चालणार नाही.शासन, प्रशासनाने व समाजानेही याली 100% दखल घेणे आवश्यक आहे.दिव्यांगा कडे माणूस म्हणून पहावे हि भावना व अपेक्षा प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी व्यक्त केली.यावेळी इतर मान्यवरांनीही दिव्यांगांना शासनाने सेवा सवलती पुरवाव्यात अशा अपेक्षा व्यक्त केली.अध्यक्षीय समारोप माजी सरपंच रामराजे गायकवाड यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



