सामाजिक

महावितरण कंपनीने बीड जिल्ह्यातील डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) साठी सुरक्षा कंपाऊंड करावे  -प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

महावितरण कंपनीने बीड जिल्ह्यातील सर्व डीपी (ट्रांसफार्मर) यांना संरक्षण भिंत बांधावी जेणेकरून कसलीही जीवित हानी होणार नाही आपल्या बाजूचा असणारा संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सर्व डीपींना संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे यामुळे त्या ठिकाणी कसलीही जीवित हानी होणार नाही तेथील धोका टळलेला आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये एकही डी.पी.ला संरक्षण भींत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी प्राणी आणि लहान मुलांचाही जीव धोक्यात आहे अशातच काल पठाणवाडी गोरे वस्ती बालेपीर भागामध्ये एका डीपीला चिटकून तेरा वर्षीय मुलांचा मृत्यू झालेला आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये ज्या महावितरण कंपनीने डीपी बसवलेल्या आहेत त्या सर्व डीपी ला ट्रांसफार्मरला लवकरात लवकर कंपाउंड म्हणजे संरक्षण भिंत बांधण्यात यावी असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!