सामाजिक

ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवी परत मिळवून देण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे शिवाजी दादा ठोंबरे यांचे समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन

केज/प्रतिनिधी

ज्ञानराधा मल्टीस्टेट तसेच जिल्ह्यातील इतर मल्टीस्टेट संस्थांमधील ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत,तसेच जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेच्या लिलावाची तारीख जाहीर करावी, अशी मागणी छावा मराठा संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात समाजकल्याण मंत्री मा. संजयजी शिरसाट यांना दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी निवेदन देण्यात आले.या निवेदनात ज्ञानराधा मल्टीस्टेटसह इतर मल्टीस्टेट संस्थांमधील ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत,अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.तसेच जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्तेच्या लिलावाची तारीख जाहीर करावी, संचालक व नातलग यांच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त करावी, डेअरी व फळबाग डेअरी जप्त करावी आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटचे फॉरेन्सिक ऑडिट तात्काळ करण्यात यावे, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

संघटनेने इशारा दिला आहे की, मागण्या तात्काळ मान्य न केल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.या निवेदनावर संघटनेच्या सरचिटणीस बाबर आसाराम आकाश, शिरसाठ महादेव राऊत, औसेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून जिल्हा प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!