अव्दैत,मृणाल यांचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वधुवरांस दिले शुभाशिर्वाद

अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील निवृत्त अधिष्ठाता डॉ.सतिश गोपाळराव देशपांडे (मोहरीर) यांचे सुपुत्र चि.डॉ.अव्दैत व सतिश राजेश्वर पाथ्रडकर यांची कन्या चि.सौ.का.डॉ. मृणाल विवाह सोहळा शुक्रवार दि.०६ फेब्रुवारी यवतमाळ येथील बालकृष्ण मंगलम येथे थाटामाटात संपन्न झाला.
मान्यवरांचे स्वागत विष्णुपंत देशपांडे, प्रा.रत्नाकर देशपांडे, डॉ.नितीन देशपांडे, निलिमा ढवळे,दिलीप ढवळे,पत्रकार संघाचे मा.कार्यवाह राहूल देशपांडे,डॉ.संदीप देशमुख, श्रीराम,निलेश, अभि,योगेश्वरी नागरी सहकारी पत संस्थेच्या संचालिका कल्याणी देशपांडे,डॉ.अपूर्वा देशमुख,अमृता,डॉ. अश्विनी,शितल,डॉ. अर्चना देशपांडे,विशाखा देशपांडे,जयश्री देशपांडे, सरिता कुलकर्णी,वैजयंती पाथ्रडकर आदींनी केले. या विवाह सोहळ्यासाठी नवविवाहित वधू वरांस शुभेच्छा व आशिर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



