सामाजिक

पवन सुर्यकांत चव्हाण यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड

बीड/प्रतिनिधी

दि.२६ मार्च २०२६ रोजी पोहरादेवी येथे भक्तीधाम धर्मपीठ गोर बंजारा साहित्य परिषद निमित्त राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी पवन सुर्यकांत चव्हाण यांची नुकतीच सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी मुळे समाजबांधवांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.

पवन चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून बंजारा समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर जिल्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.या निवडीनंतर बोलताना पवन चव्हाण म्हणाले की,संघटनेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे,त्या विश्वासाला पात्र ठरून मी जिल्ह्यातील तांड्या- वस्त्यांवरील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन.समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे माझे मुख्य ध्येय असेल.

जिल्हा अध्यक्ष नियुक्तीपत्र किसन भाऊ राठोड संघटन समन्वयक, रामेश्वर नाईक मुख्यमंत्री आरोग्य दुत,ॲड.पंडित राठोड राष्ट्रीय कार्याध्यक्ष,डॉ.मोहन चव्हाण,धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज,गोर नायक उमेश राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सत्यम पवार,प्रदेश प्रवक्ते,डॉ.तुषार राठोड संघटक बाजीराव महाराज,श्रीमंत राजे युवा प्रदेश अध्यक्ष मिथुन राठोड प्रवक्ते,संतोष राठोड इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!