
केज/प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार सौ.संगीताताई ठोंबरे यांनी नुकताच शिवसेना शिंदे पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला होता.त्यांना शिवसेना पक्षाच्या उपनेते पदावर निवड करण्यात आली आहे.
त्या निमित्ताने संत रविदास विश्व महापीठाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव,भारतीय नरेंद्र भाई मोदी संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रीय सदस्य,योगी आखाडा दिल्ली, राष्ट्रीय मंत्री गोरक्षक सेना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बेटी बचाव बेटी पढाओ फाउंडेशन,तथा बीड जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार संघ बीड यांनी सत्कार केला आहे. यावेळी भारतीय जनता मजदुर संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय कुलकर्णी,वडार समाज बीड जिल्हाध्यक्ष सतीश पवार,भारतीय जनता मजदुर संघाचे मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील, शंकर ठोंबरे,अनील पाखरे,सतीश डांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



