सामाजिक

कला क्रीडा विश्व समिती च्या वतीने श्री स्वामी समर्थ वृद्ध आश्रम येथे अन्नदान करून मूकनायक दिन साजरा 

केज/प्रतिनिधी

यश तांबवेश्वर सेवाभावी संस्था,केज संचलित स्वामी समर्थ वृद्धाश्रम बोबडेवाडी,ता.केज येथे मूकनायक दिनानिमित्त अत्यंत भावनिक, सामाजिक बांधिलकी जपणारा व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.वृद्धांच्या जीवनात आनंद,आपुलकी व सन्मानाची भावना निर्माण करणारा हा उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.

या कार्यक्रमास वृद्धाश्रमाचे संस्थापक श्री.महादेव सोपानराव कराड यांच्या मार्गदर्शना खाली सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मूकनायक दिनानिमित्त केज येथील कला क्रीडा विश्व समिती च्या कलाकारांनी गीत- संगीताचा सुंदर कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून वृद्धांना गाण्यांची मैफील बहाल करण्यात आली. वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान व आनंद पाहून उपस्थितांचे मन भरून आले.या कला क्रीडा विश्व समितीच्या सर्व कलावंतांच्या पुढाकारातून वृद्धाश्रमा साठी अन्नदान करण्यात आले,ज्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक सेवेची खरी उंची लाभली.

यावेळी अनिल वैरागे, मुनीर कुरेशी,बलभीम मस्के,ज्ञानेश्वर नागरगोजे, महेश जाधव,श्रीनिवास नवगिरे,अमोल सरवदे, धनराज भालेराव,सागर वाघमारे,ॲड.अनिता मुंडे, सुनिता बोधने,दिक्षा कांबळे,विमल अंकुशे, सुनिता नागरगोजे,छबु अंधारे,सिंधु मुळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.मूकनायक दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच नुकतेच विमान अपघाता मध्ये निधन झालेल्या स्व. अजित दादा पवार व वैमानिक,सुरक्षा रक्षक, हवाई सुंदरी यांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,पांडुरंग कसबे, पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत घाडगे,तालुकाध्यक्ष दिनकर जाधव,जयपाल रोकडे,चंद्रपाल मस्के यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.याच वेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक महादेव (बापु) सोपानराव कराड यांचा सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

आलेल्या सर्व मान्यवरांसाठी तसेच वृद्धांसाठी कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.या स्तुत्य उपक्रमामुळे स्वामी समर्थ वृद्धाश्रमाच्या कार्याला तालुक्यातून मोठी दाद मिळाली असून,समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवावेत,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!