सामाजिक

कोरडेवाडीच्या साठवण तलावासह इतर मागण्या साठी जलसमाधी आंदोलन राजश्री राठोड यांचे 9 दिवसा पासून उपोषण

केज/प्रतिनिधी

ज्ञानराधा मल्टी स्टेट मधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कोरडेवाडीच्या साठवण तलावाच्या कामासाठी लागणारे पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागण्यासाठी मागील सहा दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड या 9 दिवसा पासून कोरडेवाडी येथे उपोषणाला बसल्या आहेत. तीन दिवसापूर्वीच गावकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात बैलगाडीत साठाभरून आणलेल्या लाकडासंह बैलगाडी पेटवून देऊन प्रशासनाचा निषेध नोंदविला होता.

तरीही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहात नसल्याच्या निषेधार्थ प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी सकाळी साडे आकारा वाजल्यापासून पासून दुपारीं साडे तीन वाजेपर्यंत 50 हुन अधिक, महिला व नागरिक यांनी कोरडेवाडी पासून 6 किमी अंतरावर असलेल्या वडवणी तालुक्यातील टोकेवाडी शिवारातील पाझर तलावातील पाण्यात शिरून तीन तास जलसमाधी आंदोलन केले.

नायब तहसीलदार अशोक भंडारे, जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता मुंडे, खोदे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे पथक , 3 प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक, अग्नीशामक दलाच्या गाडीसाह, राज्य आपत्ती व्यवस्थिसपण कक्षाचे पथक,पाण्यातील बोटीसह, सुरक्षा जवान

यांचे पथक, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी घटणास्थळी तैनात होते.

उपविभागीय अधिकारी ढाकणे बोलताच आंदोलन मागे…. केज येथील जलसंधारन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी ढाकणे यांचेशी भ्रमनध्वनी वरून बोलणे होताच लवकरच मंत्रालयातून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आपल्याला उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन देताच हे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले.

4 आंदोलक रुग्णालयात..

जलसमाधी आंदोलन करताना गोरख मारुती शिंदे, विक्रम अभिमान शिंदे, शौकत निजाम शेख आणि मदन आश्रुबा यादव यांच्या नाका, तोंडात पाणी गेल्यामुळे बोटीच्या साहाय्याने सुरक्षा दलाच्या जवानाने या चौघांना पाण्याबाहेर काढून त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आसून त्यांची तब्बीयत धोक्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय केंद्रे यांनी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!