नालंदा विद्यालयात आनंद नगरी मेळावा उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
नालंदा विद्यालय केज या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, आणि त्यांना व्यवहारिक गणिताचे धडे मिळावेत या उद्देशाने आनंदनगरी बाल आनंद मेळावा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.आनंद नगरी या कार्यक्रमाचे उद्घाटन नालंदा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नंदकुमार मस्के सर यांनी फीत कापून केले. उद्घाटनाच्या वेळी शाळे तील शिक्षक श्री.गरड सर कांबळे.सर,कदम सर, वाघमारे सर,बडे सर, श्रीमती गुरमे मॅडम,पालक व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार मस्के सर यांनी सांगितले की,केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नफा तोटा, खरेदी विक्री आणि बचतीचे महत्त्व समजून येते. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमामुळे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले.शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ,घरगुती खाद्यपदार्थ,यांची छोटी छोटी दुकाने थाटात मांडली होती.
त्या दुकानात भेळ,पावभाजी,पाणीपुरी, पोहे,सँडविच,कांदा भजी, कांदा पकोडे,पुलाव,फ्रेंच फ्राय,गोबी मंच्युरियन, अशा विविध दुकानावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.विशेष म्हणजे चिल्लर पैशांचा हिशोब आणि ग्राहकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाखाणण्या सारखा होता.या आनंद नगरी मेळाव्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आनंदनगरी मेळाव्यात कुमारी सुहाना शेख,शेख अफसाना,शेख आलिया,शेखजरिया,शेख रेश्मा,सिरसट रूपाली,चि. मस्के अंकुर,आलाट विवेक,केकाण सोहम, गाडे हर्षद,जाधव कृष्णा, गवळी अनिकेत इत्यादी विद्यार्थ्यांनी थाटात दुकाने मांडली.हा आनंद नगरी सोहळा यशस्वी करण्या साठी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी परिश्रम घेतले . मेळाव्याच्या समाप्तीच्या वेळी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.कांबळे सर यांनी केले. व शेवटी कांबळे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.



