सामाजिक

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कोल्हेवाडी येथे पिठाच्या गिरणीचा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन.

केज/प्रतिनिधी

ग्रामपंचायत कार्यालय, कोल्हेवाडी यांच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गावातील सर्वसामान्य जनतेसाठी मोफत धान्य दळण्याच्या सुविधेसह पिठाच्या गिरणीचा उद्घाटन कार्यक्रम शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या पिठाच्या गिरणीचे उद्घाटन भास्करराव पेरे पाटील आदर्श सरपंच,पाटोदा, छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या उपक्रमामुळे कोल्हेवाडी गावातील शेतकरी,महिला व सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून गावाच्या स्वावलंबनाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. विठ्ठलदादा नागरगोजे गट विकास अधिकारी, पंचायत समिती केज,श्री. राठोड साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी,पं. स.केज, श्री.रोडेवार साहेब विस्तार अधिकारी,पं.स. केज तसेच श्री.महेंद्र धाकपाडे ग्रामविकास अधिकारी,कोल्हेवाडी यांची उपस्थिती लाभणार आहे.

उद्घाटन कार्यक्रम सार्वजनिक हातपंपा समोर,कोल्हेवाडी येथे होणार असून या कार्यक्रमाचे स्वागत व आयोजन सरपंच,उप सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहावे,असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!