शैक्षणिकसामाजिक

बनसारोळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कल्याणराव काकडे दादा जयंती निमित्त भिंती पत्रकाचे अनावरण

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि कल्याणराव काकडे दादा जयंतीच्या अनुषंगाने भिंत्ती पत्रकाचे अनावरण करण्यात आले.या भिंत्ती पत्रकात विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कल्याणराव काकडे दादा यांच्या जीवनकार्यावर सुंदर, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी इंग्रजी लेख लिहिले होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या लेखांमधून शिक्षण,सामाजिक परिवर्तन व प्रेरणादायी विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले.या उपक्रमात साक्षी बावकर,साधना सुवर्णकार,करुणा देशमुख,मुक्ता शिंदे व श्रद्धा जोगदंड या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.सर्व लेख दर्जेदार होते.या लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक साधना सुवर्णकार हिने तर द्वितीय क्रमांक साक्षी बावकर हिने पटकावला.भिंत्तीपत्रका च्या अनावरण कार्यक्रमास अशोकराव काकडे,मुरलीधरराव काकडे,प्रभारी मुख्याध्यापक बालासाहेब काकडे,राजपाल भैय्या काकडे,निळकंठ काकडे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मनापासून कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या भिंत्ती पत्रकाची संकल्पना व मार्गदर्शन रोकडे एस.व्ही. यांनी केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनाला चालना मिळाली असून सामाजिक व शैक्षणिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!