सामाजिक
स्वरूप ठोंबरे यांची एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर पदी निवड,केज येथे सत्कार

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील उंदरी येथील भूमिपुत्र स्वरूप बिभीषण ठोंबरे यांची संरक्षण प्रबोधनी द्वारे एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर पदी निवड झाली आहे.जिद्द,मेहनत करून यश संपादन केले आणि केज तालुक्याचे नाव मोठे केले.लवकरच देशसेवा करण्यासाठी स्वरूप रुजू होणार आहे. याबद्दल केज येथे सत्कार करण्यात आला.
राहुल भैया देशमुख,विनोद गुंड, छावाचे जिल्हा प्रमुख शिवाजी ठोंबरे आदींच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे.स्वरूपचा आदर्श घेऊन युवकांनी यश संपादन करावे असे मत राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे



