सामाजिक

धार्मिक स्थळांसाठी ध्वनिक्षेपक परवाना अनिवार्य, केज मधील मंदिरांनी घेतला पुढाकार !

केज/प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि गृहविभागा च्या मार्गदर्शक सूचनां नुसार,केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) परवाना घेणे बंधनकारक केले आहे.या मोहिमेला प्रतिसाद देत शिक्षक कॉलनी येथील विविध मंदिरांच्या वतीने अधिकृत परवाना प्राप्त करण्यात आला आहे.

नियमांचे पालन विविध मंदिरांना परवाना सुपूर्द

शिक्षक कॉलनीतील हनुमान मंदिर,दत्त मंदिर, विठ्ठल-रूखमाई मंदिर आणि महादेव मंदिर या देवस्थानांसाठीचा अधिकृत लाऊडस्पीकर परवाना आज केज पोलीस ठाण्यात प्रदान करण्यात आला.सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे आणि गुप्त वार्ता विभागाचे कागदे साहेब यांच्या हस्ते हा परवाना सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी पत्रकार प्रकाश मुंडे,वैभव सोनू धस आणि वैभव केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.पोलीस प्रशासनाचे आवाहन पोलीसनिरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी स्पष्ट केले आहे की, आवाजाची मर्यादा आणि वेळेचे भान राखण्यासाठी परवाना असणे आवश्यक आहे.अटी व शर्तीसह हा परवाना विशिष्ट अटी आणि शर्तींसह देण्यात आला आहे.इतरांनाही आवाहन शहरातील व तालुक्यातील इतर सर्व धार्मिक स्थळांनी, मंडळांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपले परवाने मिळवून घ्यावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कायद्याचे पालन करून धार्मिक उत्सव आणि दैनंदिन विधी साजरे करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.शिक्षक कॉलनीतील मंदिर समितीने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.

—स्वप्निल उणवने,पोलीस निरीक्षक,केज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!