केज तालुक्यातील देवगावचे भूमिपुत्र उत्तरेश्वर(अण्णा) महिपती मुंडे यांना सुभेदार मेजर म्हणून पदोन्नती,आज ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचे आयोजन

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील देवगाव येथील ऊत्रेश्वर (अण्णा) महिपती मुंडे यांची सुभेदार मेजर पदी नुकतीच पदोन्नती झाली, त्यांच्या झालेल्या पदोन्नती पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी देवगाव येथील गावकऱ्यांच्या वतिने भव्य सत्कार करण्यात येणार असुन प्रमुखपाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर यांची उपस्थिती राहणार आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,देवगाव येथील फौजी ऊत्रेश्वर (अण्णा) महिपती मुंडे यांची सुभेदार मेजरपदी पदोन्नती झाली त्यांच्या या प्रेरणादायी प्रवास युवकांना लाभदायक ठरेल ग्रामीण भागातील युवक जिद्द चिकाटी परिश्रमाने यश गाठु शकतो बद्दल त्यांचे मा.जि.प.उपाध्यक्ष, विक्रम बप्पा मुंडे,कॅप्टन राम नागरगोजे,रमाकांत बापु मुंडे,मा.जिल्हा परिषद सदस्य विजयकांत भैय्या मुंडे,सरपंच अतुल दादा मुंडे,अँड.नवनाथ मुंडे,अँड.वैजनाथ बापु मुंडे,पत्रकार महादेव गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते गणेश मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे केज तालुका उपाध्यक्ष बालासाहेब मुंडे, ग्राम पंचायत सदस्य रामेश्वर नागरगोजे, संपादक आशोक नागरगोजे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.देवगाव येथील ग्रामस्थांनी आज सकाळी ९-०० वाजता हाकार्यक्रम आयोजित केला आहे.



