प्रशासकीय

केज शहरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण उत्साहात संपन्न,डिजे मुक्त उत्सव साजरा, केज पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी मानले आभार 

केज/प्रतिनिधी

केज पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण १०३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, जल्लोषात आणि सामाजिक भान राखून साजरा केला.विशेष म्हणजे,यावर्षी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला गणेशोत्सवाचे दहा दिवस भक्तिभावात पार पडल्यानंतर गणरायांचा निरोपदेखील शांततेत, कोणतीही अनुचित घटना न घडता झाला.

याचदरम्यान मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-ए-मिलाद देखील आनंदी वातावरणात, आपापसातील बंधुभाव जपत साजरा करण्यात आला.दोन मोठे सण एकाच कालावधीत आल्यामुळे प्रशासन आणि पोलीस यांच्या समोर आव्हान होते, परंतु नागरिकांच्या सहकार्यामुळे दोन्ही सण शांततेत आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले.

या यशस्वी आयोजनाबद्दल केज पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी हद्दीतील सर्व गणेश भक्त नागरिक, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी,सर्व मुस्लिम बांधव,केज नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड सर्व पदाधिकारी,नगर पंचायतचे मुख्याधिकारी व कर्मचारी वृंद,सर्व पोलीस मित्र,होमगार्ड बांधव तसेच केज शहरातील पत्रकार बांधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.

पोलिस प्रशासन, स्थानिक स्वराज्यसंस्था, पत्रकार आणि नागरिकांच्या समन्वया तून सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण यादोन्ही सणांमध्ये पाहायला मिळाले.डिजे मुक्त उत्सव साजरे झाल्यामुळे नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!