सामाजिक

स्वानंद सार्वजानिक वाचनालयात मराठी भाषा संवधन पंधरवाडा निमित्त ग्रंथप्रदर्शन,वक्तृत्व स्पर्धा,कथाकथन, काव्यवाचन व नवोदित कवींच्या सत्काराने उद्घाटन संपन्न.

केज/प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दि.१४ ते २८ जानेवारी २०२६ मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे उद्धाटन दि. १४ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाले.सर्व प्रथम ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून वंदन व पुजन करण्यात आले.त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाला मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते,प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.यावेळी नवोदित कवी प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांचा सत्कार प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ग्रंथांचे,ग्रंथालयाचे महत्व, गरज समाजाला अज्ञाना तून प्रकाशाकडे जाण्याचे साधन म्हणजे ग्रंथ असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले.स्वरचित कवितांचे सादरीकरण डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, श्रीराम गायकवाड, रावसाहेब गायकवाड, कमलाकर साबळे, शिवदास गायकवाड, सुंदर गायकवाड यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत प्रथम – यशवंत सौदागर, द्वितीय -अनुजा घोगले, तृतीय – ईश्वरी गायकवाड यांनी प्राविण्य मिळविले.

यानंतर कथाकथन कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम – चैतन्य गायकवाड, द्वितीय – यशराज गायकवाड,तृतीय – सुशांत सौदागर यांनी प्राविण्य मिळविले.त्यानंतर काव्यवाचन घेण्यात आले.प्रथम – विक्रम गायकवाड,द्वितीय – बालाजी बोडके,तृतीय – वेदिका गायकवाड यांनी प्राविण्य मिळविले.बक्षिस वितरण ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड, महादेव राऊत यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.

अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. अध्यक्षीय समारोपात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संबंधी सविस्तर विचारमंथन केले.केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे.यामुळे मराठी भाषा,मराठी साहित्याला निश्चितच उभारी मिळणार आहे. नागरीक म्हणून मराठी भाषेला गौरवाचे,वैभवाचे दिवस येण्याचे वाचकांनी मराठी साहित्य वाचावे, साहित्यकांनी मराठी साहित्य लिहावे,मराठी तच बोलावे,आपले व्यवहार मराठीतूनच करावेत,मराठी ही आपली मातृभाषा आहे,माय मराठीचे जतन,संवर्धन करणे प्रत्येक मराठी माणसाचे, वाचकांचे, नागरीकांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी,युवक,वाचक, जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.दि.१४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात परिसंवाद,चर्चासत्र,क्षलेखक कवींचे मार्गदर्शन, घोषवाक्य,शब्दकोडी,ग्रंथ समिक्षण कार्यशाळा, शिबीर, कविसंमेलन, बालनाट्ये,मराठी वाचन कट्टा, साहित्य पुरस्कार वितरण व इतरही कार्यक्रम होणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!