वैद्यकीय

केज उपजिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

केज/प्रतिनिधी

केज येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.स्तनदा मातांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे यांनी स्तनपान या विषयावर मार्गदर्शन केले.आहार तज्ञ सुलक्षणा पाटील यांनी आई व बाळासाठी स्तनपानाचे महत्त्व सांगितले.स्तनदा मातेच्या आहाराविषयी मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख उपस्थिती स्त्री रोग तज्ञ इंगोले, समुपदेशक सीता गिरी यांनी स्तनपानाच्या वेगवेगळ्या पद्धती विषयी स्तनपानाविषयी मार्गदर्शन केले.यावेळी अधिपरिचारिका यांची उपस्थिती होती. चित्रफित,चार्टच्या माध्यमातून मातांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास स्तनदा मातांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!