उद्योगसामाजिक

गंगा माऊली शुगरने केला ५ लाख ५० हजार गाळपाचा टप्पा पूर्ण, जिल्ह्यात उत्कृष्ट ११ चा साखर उतारा

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात देखील चांगला साखर कारखाना निर्माण व्हावा व सर्वांना हक्काचा कारखाना वाटावा ही मनोमन असणारी शेतकऱ्यांची इच्छा व गरज लक्षात घेता बीड जिल्ह्याचे सुपुत्र लक्ष्मण मोरे यांनी मागच्या तीन वर्षांपूर्वी गंगा माऊली शुगर सुरू केला आणि शेतकऱ्यांना देखील आशेचा किरण पाहायला मिळाला व आज गंगा माऊली शुगर हा कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र झाला असून या गळीत हंगामात ५ लाख ५० हजार ८८ गाळप करून ११ चा उत्कृष्ट साखर गाळप उतारा कारखान्याने स्थापीत केला.

याबद्दल सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कर्मचारी यांच्यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हिताचा कारखाना म्हणून आता गंगा माऊली शुगर या कारखान्याने अल्पावधीत आपली ओळख निर्माण केली आहे केवळ साखरेचे गाळप करून इतर कारखान्याच्या बरोबरीने हा कारखाना उसाला भाव देत असून इतर कोणतेही उत्पादन नसल्याने केवळ आणि केवळ साखर उत्पादना वर हा भाव देणे तसे सोपे नाही मात्र लक्ष्मणराव मोरे यांनी सुरुवातीलाच सांगितले होते की,या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरच हसू हाच आमचा नफा असेल आणि अगदी त्याच प्रमाणे शेतकरी वर्ग या कारखान्याच्या बाबतीत आनंदी आहे.

पंधरा दिवसाला बील देणारा एकमेव कारखाना

या कारखान्याने एक वैशिष्ट्य अगदी पहिल्या गळीत हंगामापासून जपले आहे ते म्हणजे दर १५ दिवसाला शेतकऱ्यांना उसाचे बील दिले आहे.आज देखील २८ फेब्रुवारी पर्यंतचे बील देऊन कारखान्याने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे.हा कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र रहावा यासाठी लक्ष्मणराव मोरे हे प्रयत्न करत आहेत त्यांच्या सोबत या कारखान्याच्या बाबतीत आदित्य पाटील,राहुल सोनवणे,हनुमंत काका मोरे,प्रविण मोरे, अविनाश मोरे यांचेही प्रयत्न मोठे मोलाचे असून यांचेसह कर्मचारी यांनी देखील कारखान्याचे गाळप मोठ्या ताकतीने सर्वांनी मिळून केले व आज रोजी ५ लाख ५० हजार ८८ गाळप करून गंगा माऊली शुगर हे गाळप बंद करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!