केज येथे सदगुरु धुंडा महाराज व सौ.कृष्णामाई यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाला प्रारंभ

केज/प्रतिनिधी
वै.सद्गुरु श्री धुंडामहाराज देगलुरकर व मातोश्री सौ. कृष्णाबाई यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने केज शहरात भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन राम मंदिर,पाटील गल्ली केज येथे करण्यात आले आहे.हा धार्मिक व आध्यात्मिक उत्सव दि.४ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान श्रीराम मंदिर, पाटील गल्ली,केज जि. बीड येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यासाठी आशीर्वाद श्रीगुरु चैतन्य महाराज देगलुरकर यांचे लाभलेले असून,दररोज सकाळी ८-०० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात आली ज्ञानेश्वरीपारायण सकाळी ९-३० ते १२-३० यावेळेत हरिपाठ,दुपारी ४-०० वाजता व हरिकीर्तन सायंकाळी ५-०० ते ७-००कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.या
महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार असून, दि.४ जानेवारी ह.भ.प. शिवाजी महाराज मुळे आडस,दि.५ जानेवारी रोजी ह.भ.प.अंबादास महाराज चिक्षे अंबाजोगाई,दि.६ जानेवारी रोजी ह.भ.प. श्री शिवराम महाराज मुळे साबला,दि.७ जानेवारी रोजी ह.भ.प.गणेशानंद महाराज जोगदंड शास्त्री, साळेगाव,दि.८ जानेवारी रोजी ह.भ.प.दीपक महाराज मेटे लहूरीकर, दि. ९ जानेवारी रोजी ह.भ.प. प्रमोद महाराज पवार चंदनसावरगाव, दि.१० जानेवारी रोजी ह.भ.प. महंत भगवान महाराज शास्त्री,तर दि.११ जानेवारी रोजी ह.भ.प. भालचंद्र महाराज देव केजकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.७ जानेवारी रोजी वै. सद्गुरु श्री धुंडा महाराज देगलुरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीपोत्सव व कीर्तनानंतर होणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमासाठी केज व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक समस्त भक्तगण,केज यांच्या वतीने करण्यात आले आहे.



