सामाजिक

रोहन गलांडे पाटील यांच्या आमरण उपोषणाला यश, प्रशासनाने सर्वच मागण्या केल्या मान्य

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पत्रकार,संपादक समाज सेवक रोहन गलांडे पाटील यांनी १३ दिवस अमरण उपोषण केले व त्यांच्या मागण्या केज प्रशासनाने,प्रशासनाचा भाग तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग,कृषी अधिकारी, ग्रामसडक योजना अधिकारी यांनी मान्य केल्या आहेत तसेच गावात दुःखद घटना घडली.त्यामुळे उपोषण मागे घेतले या विषयी सविस्तर वृत्त असे की, त्यांच्या मागणीनुसार चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम २० जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे, असे पत्र त्यांना देण्यात आले आहे .

तसेच केज तालुक्यातील विहीर व गायगोठा,घरकुल योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे असे पत्र देण्यात आले आहे तसेच चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होती त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे त्यांची पुढील कार्यवाही उच्च शिक्षण संस्था अधिकारी यांच्या कडून करणार आहे असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.

तसेच केज तालुक्यातील महाडीबीटी योजनेची रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे. त्यांचे पत्र तालुक्याचा अहवालासह १०जानेवारी रोजी मिळणार आहे. तसेच चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या व जुन्या इमारतींच्या पुनर्विकासा साठी कीती निधी खर्च केला त्यांची चौकशी केली असुन खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे तरी पुढील कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे .

तसेच चिंचोली माळी येथील गायरान परीसरातील सौरऊर्जा प्रकल्प काम १५ जानेवारी रोजी सुरू करण्यात येईल असे केज तहसीलदार यांनी म्हटले आहे तसेच मुख्य मागणी श्री संत नामदेव महाराज सभागृह ते नागबेट वस्ती अतिक्रमण हटविण्याचे काम व रस्ता व नालीचे काम काही कालावधी नंतर होईल असे पत्र प्राप्त झाले आहे तसेच काही मागण्या वर कार्यवाही सुरू आहे तरी रोहन गलांडे यांच्या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत.

तसेच रोहन गलांडे यांनी प्रसार माध्यमांना संपादक, पत्रकार साथीदार आमरण उपोषणाला भेट देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत तसेच विरोध,बदनामी करणाऱ्यावर मी बोलावे एवढे विरोध त्या लायक नाही कारण मी त्यांना झेपलो नाही त्यांनी बदनामी केली माझे आंदोलन मोडून काढण्यासाठी मंत्र्यांची मदत घ्यावी लागली असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!