
केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेत मुंडा जमातीचे लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दि.15 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उलीहातु येथे दि. 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला.बिरसा मुंडा हे 19 व्या शतकातील एक आदिवासी स्वातंत्र्यसैनिक व मुंडा जमातीचे लोकनायक होते.ज्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध आणि जमिनदार जमात वाद्या विरुध्द संघर्ष केला. त्यांनी ‘उलुगान’ (मोठी चळवळ)चे नेतृत्व केले.
त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांना धरती आबा म्हणून ओळखले जाते.बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय आदिवासी गौरव दिवस साजरा केला जातो.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेचे प्राथमिक पदवीधरशिक्षक श्री डॉ.रामकिशन मुळे सर,श्री लोंढे आकाश दत्तु सर ,श्री संदीप ठोंबरे सर, श्री राहुल बजरंग बचुटे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती निलावती आनंदराव भोरे मॅडम, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,ट्रेनी शिक्षिका रोहिणी काळे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली.
बिरसा मुंडा यांना भगवान मानलेजाते. त्यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री राहुल बजरंग बचुटे सर यांनी केले व श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम यांनी आभार मानले.



