सामाजिक

तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केज टाकळी शिव रस्ता मोकळा करुन दिल्याने शेतकरी झाले आनंदी

केज/प्रतिनिधी

ग्रामीण भागातील शेती साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे पाणंद रस्ते व शिव रस्ते हे मोकळे करण्यासाठी केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी अनेक गावात ही मोहिम राबवून अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांना समजावून सांगत केज टाकळी हा शिव रस्ता सोमवार दि.२९ डिसेंबर रोजी मोकळा करुन दिल्याने या रस्त्यावरील शेतकरी बांधव आनंदी झाल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात शेतक-यांना ये-जा करण्यासाठी पाणंद रस्ते व शिव रस्ते मोकळे करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे नियोजन जाहीर केले.या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्या साठी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती.

शासनाच्या या निर्णयाचे पालण करत केज तालुक्यातील टाकळी शिवारातील राज्यमार्गा पासुन दक्षिण उत्तर जात असलेला केज ते टाकळी हा शिव रस्ता सर्वे नंबर १०७,१०८ व केज शिवारातील सर्वे नंबर ४८ मधून शिव रस्ता पुढे चिंचोलीमाळी,नांदूरघाट रोडला जोडला जाणारा रस्ता हा गेल्या पन्नास वर्षापासून काही शेतक-यांनी या रस्त्याच्या आजबाजूने अतिक्रमण केल्याने हा रस्ता अरुंद झाल्याने या रस्त्यावरून जाणा-या व येणा-या

शेतक-यांना शेतात आपले वाहन घेऊन जाणे मोठे आवघड झाले होते. त्यामुळे या शिव रस्त्या वरील काही शेतक-यांनी शासनाने काही दिवसापूर्वी शिव रस्ता व पाणंद रस्ता संदर्भात काढलेला शासन निर्णय केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांना दाखवून हा शिव रस्ता शेतक-यांसाठी मोकळा करुन देण्याची मागणी केली होती.मंडळ अधिकारी व तलाठी यांनी या शिवरस्त्याचा पंचनामा करुन सदरील अहवाल हा केज तहसील कार्यालयात सादर केल्यानंतर केजचे तहसीलदार राकेश गिड्डे हे दि.२९ डिसेंबर सोमवार रोजी महसुलचे कर्मचारी व मंडळ अधिकारी भालेराव,तलाठी इनामदार यांना सोबत घेऊन शिव रस्त्याची पाहणी केली.

यावेळी उपस्थित असलेल्या शेतक-यांने शासन निर्णयाची माहीती सांगून हा शिव रस्ता मोकळा करुन दिला.यावेळी टाकळीचे सरपंच अनंत घुले,ग्रा.प.सदस्य सुरेश घुले,शेतकरी रमाकांत बापू मुंडे यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.हा शिवरस्ता मोकळा करुन दिल्याने या शिव रस्त्यावरील शेतक-यांना मोठा आनंद झाला.हा शिव रस्ता केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी मोकळा करुन दिल्याने त्यांचे भागातील शेतक-यांनी धन्यवाद मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!