शैक्षणिक

निरोप समारंभ माऊली विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना जड अंतःकरणाने निरोप 

केज/प्रतिनिधी

जवळबन येथील माऊली विद्यालय जवळबन ता. केज येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. शालेय जीवनाचा एक टप्पा पूर्ण करून भविष्यातील स्वप्न साकारण्यासाठी सज्ज झालेल्या या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी विद्यालयाचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक श्री.गदळे जी.बी.होते. प्रमुख अतिथी म्हणून जवळबन गावचे सरपंच श्री.राजेभाऊ करपे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बालासाहेब भाकरे बप्पा, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक श्री.माने ए.एन आणि जवळबन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.मोरे साहेब यांची उपस्थिती होती.

मार्गदर्शन आणि शुभेच्छा

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गदळे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही आयुष्या तील कोणतीही परीक्षा यशस्वीपणे पार करू शकता.दहावीची परीक्षा ही तुमच्या करिअरची पहिली पायरी आहे. तसेच सरपंच श्री. राजेभाऊ करपे आणि बालासाहेब भाकरे यांनीही विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहित केले.

शिक्षकांचे परिश्रम

हा निरोप समारंभ यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले.यामध्ये श्री.हजारे एस.बी,श्री. सोळंके एस.डी,श्री. देशमुख आर.आर, श्री.निकम ए.एम,श्री.पवार एल.एफ यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ‘हॉल तिकीट’ आणि शुभेच्छा देऊन निरोप दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!