
केज / प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी साने गुरुजी जयंती, पेरियार ई.व्ही.रामासामी पुण्यतिथी,भारतीय ग्राहक दिन इत्यादी निमित्ताने व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सर्वप्रथम सानेगुरुजी, पेरियार ई.व्ही.रामास्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. त्यानंतर एस.के.वैरागे,बाळासाहेब गायकवाड,संभाजी लवटे यांची थोडक्यात व्याख्याने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, राजेभाऊ बोडखे,शिवाजी गायकवाड,नारायण गायकवाड,माऊली कदम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले. दि.२० डिसेंबर २०२५ रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.यावेळी दादासाहेब गायकवाड, रामराजे गायकवाड यांची थोडक्यात व्याख्याने झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. या वेळी एम.बी. गायकवाड,नारायण गायकवाड,रमेशराव गायकवाड,संभाजी लवटे, शिवाजी गायकवाड, माऊली कदम, राजेभाऊ बोडखे,सिताराम वैरागे, बाळासाहेब गायकवाड, रविंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले. दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.त्यानंतर बाळासाहेब गायकवाड, विरा सोनवणे,दिव्या साबळे यांनी गाथा वाचन केले.तसेच गंगाधर वैरागे, लक्ष्मी चौरे,कृष्णराजे गायकवाड,शौर्य गायकवाड यांनी ग्रंथ वाचन केले.
अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्टातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन,आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



