प्राचार्य डॉ.वसंत माळी यांना गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहिर,कुलगुरू ज्ञानदेव मस्के,प्राचार्य बाबासाहेब गोरे,सुभाष सारडा यांचाही होणार सन्मान.

केज/प्रतिनिधी
उल्हासनगर येथील जे. वाटुमल साधुबेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत माळी यांना आष्टी येथील भगवान कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतिने आयोजित गंगाई-बाबाजी कला महोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त (२०२५-२६)आदर्श पुरस्कार जाहिर झाला आहे.उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहिर झाला आहे.
दि.१ जानेवारी २०२६ रोजी आष्टी येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.डॉ.वसंत माळी हे मुंबई विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन असुन ते मुंबई विद्यापीठाच्याअधिसभेवर प्राचार्य गटातुन सदस्य म्हणून ही काम पहात आहेत.डॉ.वसंत माळी यांनी आपल्या अध्यापनाची सुरूवात बीड जिल्ह्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख म्हणून केली.
ते या महाविद्यालयात जुन १९९२ ते २०१६ पर्यंत कार्यरत होते.२०१६ पासुन ते जे.वाटुमल साधुबेला महाविद्यालय, उल्हासनगर चे प्राचार्य म्हणून ते काम पहात आहेत.डॉ.माळी यांनी आपल्या शैक्षणिक संशोधनातून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदामधुन वनस्पती शास्त्र विषयात विद्यार्थी व संशोधकांना मार्गदर्शन केले आहे.
थायलंड, दुबई, व्हियेतनाम व इतर विविध देशात आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले आहे.प्राचार्य डॉ.वसंत माळी यांच्या या यशा बद्दल साधुबेलाएज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी खासदार उत्तम सिंग पवार,सचिव नितीन बागवे,माजी आमदार भिमराव धोंडे,प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



