खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची शिकवण सर्वांच्या कृतीत आली पाहिजे. – डॉ.हनुमंत सौदागर.

केज/प्रतिनिधी
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची शिकवण आपल्या सर्वांच्या कृतीत आले पाहिजे असे मत डॉ. हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले.ते भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयात साने गुरुजी जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्राचार्य श्रीकांत लुंगारे,अधिव्याख्याता नारायण चोले,लामतुरे ओ.एस,बलाढ्ये यु.बी, कचरे जे एस,जगदाळे एम.एच,वामन चिगुरे, सुजित नाईकवाडे,सतीश नेहरकर आदी उपस्थित होते.छात्र अध्यापक सोनम सोनवणे,ऋतुजा इंगळे,पुनम यादव अक्षय राऊत,सुप्रिया पवार आदी विद्यार्थ्यांनी विचार मांडले.
पुढे बोलतांना ते म्हणाले शेतकरी,कष्टकरी,वंचित उपेक्षितांसाठी आयुष्यभर लढा देणारे साने गुरुजी साहित्यातून वास्तवदर्शी जीवन मांडत राहिले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सेवाकार्याचा वसा सांभाळावा असे मत त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष कुमार साळवी यांनी केले तर आभार रमेश रितापुरे यांनी मानले.



