
बीड /प्रतिनिधी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा निसर्गाने खरीप हंगामा च्या सुरुवातीला साथ दिली शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतानाच ऑगस्ट, सप्टेंबर मधील सलग अतिवृष्टीने कापूस पिकाला मोठा फटका बसला अनेक गावातील पिके पाण्यात बुडाली. बोंडगळ होऊन उत्पादन तब्बल चार ते पाच क्विंटलवर आले.अशातच बाजारात कापसाला 6900 ते 7000 हजार रुपये दर मिळतअसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
अतिवृष्टीचा तडाखा,उत्पन्न कोसळले नेकनूर बाजार,वडवणी बाजार,पिंपळनेर, कवडगाव,ढोक वडगाव, सावरगाव,फुलसांगवी, वडगाव गुंदा,नाहोली, निरगुडी,मिरकाळा, नाथापूर,नांदुर घाट या परिसरात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होते परंतु यंदाच्या अतिवृष्टी मुळे बोंडगळ,कीडरोगाचा ताण आणि सततच्या दमट हवामानामुळे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले शेतकऱ्यांनी एकरी सात आठ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा ठेवली असताना या वर्षी फक्त चार-पाच क्विंटलावर कापूस थांबला बाजारात भाव नाही नुकसानच नुकसान कापूस बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळत आहे.
हमीभाव केंद्र सुरू नसल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांची मनमानी चालत आहे सरकारचे आयात निर्यात धोरण कॉर्पोरेट लांबीचा दबाव यांचा थेट परिणाम किमतीवर दिसून येत आहे चार वर्षांपूर्वी कापसाला नऊ हजार रुपये भाव होता आज तो सात हजार रुपयांवर आला आहे अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
खत,बियाणे डिझेल महाग उत्पन्न कमी उत्पादन खर्च गगनाला भिडला आहे.2013 मध्ये खताची बॅग 560 रुपये एकाच बॅगचा भाव 1200 रुपये बियाणे, औषध, मजुरी,डिझेल यांचे दरही दुपटीने वाढले खर्च वाढला उत्पन्न घटले बाजार भाव कोसळले या तिहेरी संकटामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे .
कापसाला प्रतिक्विंटल 10,000 रुपये हमीभाव द्या शेतकऱ्यांची मागणी गेल्या पाच ते सात वर्षां पासून आहे कापसाचे गणित सतत बिघडत असल्याचे शेतकरी सांगतात कापूस घेतो तेवढे नुकसानच होते खाजगी व्यापाऱ्यांकडे कमी भावात माल द्यावा लागतो सरकार केवळ हिंतचिंतक असल्याचा दिखावा करते म्हणूनच राज्य सरकारनेकापसाला किमान दहा हजार रुपये हमी भाव जाहीर करावा अशी जोरदार मागणी होत आहे .
शेती करावी की नाही कर्ज काढून पिकवलेला कापूस कवडीमोल दरात विकावा लागत असल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत इतका खर्च करून एवढे काबाडकष्ट करून जर शेतमालाला भावच मिळेत नसेल तर शेती करून कर्जबाजारीच व्हायचे का? गावागावा तील शेतकरी संकटात आहेत त्यातून बाहेर काढणारा ठोस निर्णय राज्य केंद्र सरकारने तातडीने घ्यावा अशी अपेक्षा ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी व्यक्त केली आहे.



