सामाजिक

बोरफडी फाटा ते हिवरा पहाडी रस्त्याच्या विकासा बाबत मंत्री पंकजा मुंडे यांचे सकारात्मक पाऊल -युवा सरपंच कैलास घुगे 

बीड/प्रतिनिधी

मौजे बोरफडी गावचे कार्यतत्पर युवा सरपंच कैलास घुगे यांनी मुंबई येथे जाऊन बोरफडी फाटा ते हिवरापहाडी या रस्त्याच्या विकास कामाबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली असून लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लागेल असे कैलास घुगे यांनी सांगितले.या बैठकी दरम्यान ताई साहेबांनी विषयाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला तात्काळ आवश्यक सूचना दिल्या.

सदर रस्त्याचे प्रलंबित काम लवकरच मार्गी लागेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे परिसरातील नागरिकांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्यात आला असून,लवकरच परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल,अशी अपेक्षा युवा सरपंच कैलास घुगे यांनी व्यक्त केली आहे.

जनतेसाठी विकास, विकासासाठी कृती! 

हे ब्रीद वाक्य घेऊन मौजे बोरफडी गावचा विकास विविध योजनांच्या माध्यमातून साधला असून लवकरच होवू घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाली जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुक रिंगणात कैलास घुगे उतरणार आहेत.गावाच्या विकासानंतर जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी कैलास घुगे यांना भागातील मतदारांनी सहकार्य केले पाहिजे असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

विकास हेच ध्येय घेऊन कामांचा सपाटा लावलेले युवा सरपंच कैलास घुगे यांना जिल्हा परिषदेत पाठवुन भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!