अध्यात्मिकसामाजिक

काळेगाव घाट येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानयज्ञ भागवत कथा सोहळ्याचे आयोजन, मौजे काळेगाव घाट येथे भक्तीचा जागर;विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील समस्त ग्रामस्थ मंडळ व तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचेभव्य आयोजन करण्यात आले आहे.दि.९ एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार असून,परिसरा तील भाविकांमध्ये भक्ती चे वातावरण निर्माण झाले आहे.कथा प्रवक्ते आणि दैनंदिन कार्यक्रम यामध्ये सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ह.भ.प. श्री.पांडुरंग महाराज शिंपले गंगाखेडकर यांच्या रसाळ वाणीतून होणारी भागवत कथा होय.दैनंदिन कार्यक्रमा मध्ये पहाटे काकड आरती,विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी भागवत कथा आणि रात्री हरिपाठासह नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

कीर्तन महोत्सवाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे सप्ताहामध्ये दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत नामवंत महाराज मंडळींचे कीर्तन सेवा होणार आहे.दि.९ एप्रिल २०२६ अखंड हरिनाम व भागवत कथा आयोजन निमित्त ह.भ.प.पांडुरंग महाराज शिंपले यांची कथा सकाळी १० ते १२ व रात्री ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज गिरी यांचे कीर्तन होणार असून दि. १० एप्रिल २०२६ रोजी ह.भ.प.सौ शारदाबाई गालफाडे,दि.११ एप्रिल २०२६ रोजी ह.भ.प. दिपक महाराज मेटे लव्हुरीकर, दि.१२ एप्रिल २०२६ रोजी ह.भ.प. हनुमंत महाराज कोरे तांदुळवाडीकर,दि.१३ एप्रिल २०२६ रोजी ह.भ.प. विजयकुमार पोपळे,दि.१४ एप्रिल २०२६ रोजी ह.भ.प. तिळेकर महाराज आळंदीकर,दि.१५ एप्रिल २०२६ रोजी ह.भ.प. सरस्वतीताई स्वामी अंबाजोगाईकर,दि.१६ एप्रिल २०२६ रोजी ह.भ.प.श्री महंत भगवान महाराज शास्त्री मठ संस्थान वरपगाव यांचे .

काल्याचे कीर्तन व महाप्रसाद सोहळ्याची सांगता गुरूवार, दि.१६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल.त्यानंतर उपस्थित सर्व भाविकां साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या मंगलमय सोहळ्यासाठी नामवंत गायक,वादक आणि मृदंगमणी आपली सेवा अर्पण करणार आहेत. काळेगाव घाट आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या श्रवण सुखाचा आणि महा प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!