सामाजिक

एसआयआर मॅपिंग विशेष मोहिमेचा कालावधी वाढवा – प्रा. बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये एस आय आर मॅपिंगचे काम सुरू आहे या सर्वे मधील विविध समस्या संदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की,जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बीड यांचे आदेश जा.क्र २०२६/ पुर्ननिरीक्षण/ सीआर/कावि ९४ दि-२/०३/ २०२६ उपरोक्त संदर्भीय विषयांवर सविनय कळविले की,ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादी मध्ये असलेले मतदार सन २००५ रोजीच्या मतदार यादीमधील मतदाराशी मतदार मॅपिंग करणे,मतदार यादीतील नोंदी अद्यावत करणे, नोंदीची पडताळणीकरणे इत्यादी कामकाजासाठी बी एल ओ यांना दिनांक १० मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत पूर्ण वेळ कामाकरिता कार्यमुक्त करून बी एल ओ ला सदरील काम कर्तव्यदक्ष पणे करण्याचे आदेश आहेत.

वोटर टू वोटर मॅपिंगचे काम प्रगती पथावर असले तरी प्रोजेनी मॅपिंगचे काम प्रलंबित आहे.प्रोजनी मॅपिंगसाठी महिलांची माहेरकडील माहिती मिळवण्यासाठी लागणारा वेळ व माहिती उपलब्धतेचे मर्यादित स्त्रोत यामुळे बीड जिल्ह्यातील प्रोजनी मॅपिंगचे काम विहित वेळेत पूर्ण होत नाही सदर काम पूर्ण करण्या साठी जिल्ह्यातील बी एल ओ यांना विशेष मोहिमेचा कालावधी पुढील दिवसासाठी अजून वाढवून देणे गरजेचे आहे करिता विनंती की,मॅपिंग विशेष मोहिमेचा कालावधी वाढवून देण्यात यावा तसेच जे बीएलओ काम चुकारपणा करत आहेत अशांना सक्तीचे समज द्यावे अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!