करुणा सेवा ट्रस्टने दिला पूरग्रस्त भागातील कुटुंबाला मदतीचा हात

केज/प्रतिनिधी
मागील महिन्यापासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे मराठवाड्यातील जन जीवन विस्कळीत झाले होते.पुराच्या पाण्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिक हतबल झाले होते त्यांना मदतीचा हात म्हणून मुंबई येथील करुणा सेवा ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून उदय चांदाराना यांच्या सहकार्याने बीड धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
संकटात सापडलेल्या पूरग्रस्त भागातील कुटुंबांना आधार देण्याचे समाजभान राखत मुंबई येथील युवा उद्योजक प्रशांत भैय्या गाडे यांच्या माध्यमातून बीड धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात ब्लँकेट ,चादरी, अन्न धान्य ,तेल ,बिस्किटे, फरसाण,चटणी,व अन्य गृहउपयोगी वस्तू,औषधे, खाद्य पदार्थ वाटप करण्यात आले.यावेळी शिवप्रसाद ठोंबरे, अभिषेक भिसे ,राहुल ठोंबरे,बप्पा भिसे ,प्रदीप ठोंबरे ,पोपट लांडगे, राजाभाऊ इटकर,शेळके अण्णा,आकाश भैय्या फरके,मारुती नवगण, पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता.



